‘शिवशाही’च्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना सवलत - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
सध्या सुरु असलेल्या वातानुकुलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसमध्ये एकूण तिकीट मूल्याच्या ४५ टक्के तर वातानुकुलित शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बसमध्ये (एसी स्लीपर) एकूण तिकीट मूल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या १ जून २०१८ पासून म्हणजे एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून ही सवलत राज्यभर लागू करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ प्रवाशांना मिळणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.
