‘बालपण’चे राष्ट्रीय पातळीवर चमकले
आश्वी : नवीदिल्ली येथे आर्ट आँफ कल्चर या संस्थेने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी भाग घेत नऊ पारितोषिके पटकाविली. यामुळे या चिमुकल्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याचा मान मिळाला.
नवीदिल्ली येथील आर्टिलरी सेंटर येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘मोटू - पतलू’ या मालिकेचे सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ. हरविंदर मनक्कर यांच्या हस्ते संस्थेचे शिवाजी मुंढे यांनी पारितोषिक स्विकारले. या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख सोनाली मुंढे आदींसह प्राचार्य, शिक्षक आणि आश्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.