Breaking News

अकरावी प्रवेशासाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांची नोंदणी


पुणे, दि. 14, मे - पुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून त्याला पहिल्या दोन दिवसांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा पहिल्या दोन दिवसांतच साडेसात हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

अकरावी प्रवेशाचा भाग एक भरण्यास 10 मेपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची प्राथमिक माहिती भरावयाची असते. त्यामध्ये नाव, पत्ता, जात, आरक्षण आदी गोष्टींविषयी माहिती द्यायची असते. विद्यार्थ्यांना आरक्षण असेल तर त्यानुसार मुख्याध्यापकांमार्फत त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना अप्रुव्ह करून घ्यावे लागते. त्यानुसार पहिल्या दोन दिवसांतच साडेसात हजार विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेचा वापर करून प्रवेशासाठीची नोंदणी केली आहे.