दहावीच्या अभ्यासक्रमात बदल; सीबीएसईच्या धरतीवर अभ्यासक्रम शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 2018-19 या शैक्षणिक वर्षात दहावीचा सर्व अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. त्याच्या पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा दादर येथे शिवाजी मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, दहावीचा हा नवा अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तक (सीबीएसई) आणि अभ्यासक्रमाशी मिळताजुळता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील दहावीचे विद्यार्थी हे केंद्रीय मंडळाच्या मुलांशी स्पर्धा करू शकतील. बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठ्यपुस्तकांसोबत उपलब्ध होणार्या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याचा तपशील समजणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होईल.
नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धड्यांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला आहे. तसेच डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आणि सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाच्या मूल्यमापन पध्दतीसाठी हस्त पुस्तिका, हस्त पुस्तिकेच्या आधारे विषयाची ओळख, विषययोजना, कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका याचे स्वरुप आणि निर्मितीचे निकष आणि मूल्यमापन समजण्यास मदत होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. तसेच शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर यात देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या अध्ययन निष्पत्तीचा समावेश यात करण्यात आला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यास मंडळातील विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी, यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील, असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला.