Breaking News

दूधदरात वाढ करण्याची काँँग्रेसची मागणी


सोलापूर, दि. 12, एप्रिल - दूधदरात वाढ करावी, यासह विविध मागण्यांचे नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन दिले. तसेच पेट्रोल व डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत न आणण्याची मागणी के ली. शेतकर्‍यांचा जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. दूधदर वाढण्याऐवजी कमी करण्यात आला आहे. गायीच्या दुधाला 30 रुपये तर म्हशीच्या दुधाला 40 रुपये दर द्यायला हवा. काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत. तरीही सरकार इतर कराचा बोजा टाकून त्यात वाढ केल्याने महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणू नये. यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे.