Breaking News

महिला सुरक्षितता सबलीकरण जनजागृती व मोफत सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम

निर्भया- एक पाऊल बदलाकडे या विद्यार्थ्यांच्या गटाने हाती घेतलेल्या मिशन-१००००० या अंतर्गत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील एक लाख मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लोहारे येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रवरा ग्रामिण अभियांत्रिकी महाविद्यालय हे नेहमीच महाविदयालयातील विद्यार्थांच्या अष्टपैलु व्यक्तिमत्व विकासावर भर देत असते. त्यातीलच ऐक म्हणजे समाजसेवा. त्यानुसार प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निर्भया- एकपाऊल बदलाकडे यांच्या मिशन-१००००० यांच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील सॅनिटरी पॅडचे वाटप दि. १० एप्रिल २०१८रोजी लोहारे येथे गावचे सरपंच सौ. रुपालीताई बाबासाहेबदुशिंगे प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंतखर्डे, प्रा. संजय गलांडे, प्रा. सतीश शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निर्भया- एक पाऊल बदलाकडे या विद्यार्थ्यांच्या गटाने हाती घेतलेल्या मिशन-१००००० या अंतर्गत ग्रामीण भागातील एक लाख मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचा ध्यास घेतला आहे.