नगराध्यक्ष तनपुरेंमुळे ‘त्या’ कुटुंबाला मिळाले घर!
राहुरी ता. प्रतिनिधी - शहरातील रामकृष्ण मासारे यांच्या कुटुंबातील ३ अपंग मुलांना घर बांधून देण्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत राजकारणविरहित कार्य पार पाडले. यामुळे मासारे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ४० वर्षांनी या कुटुंबाला हक्काचे घर मिळाले.
आ. बच्चू कडू ३ वर्षांपूर्वी राहुरी तालुक्याचे दौऱ्यावर आले होते. अपंगांच्या मेळाव्यात तत्कालीन नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे व प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांना रामकृष्ण मासारे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी त्यांच्या कुटुंबाची कडू यांनी व्यथा मांडली. कडू यांनी तत्कालीन नगराध्यक्षा तनपुरे यांना या कुटुंबाला जागा किंवा घर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. कडू यांच्या भाषणाने नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे अंतर्मुख झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी या कुटुंबाची भेट घेत या कुटुंबाला हक्काची जागा आणि घर मिळवून देण्याची ग्वाही दिली. ती नुकतीच पूर्ण झाली. यावेळी श्रीपाद कुलकर्णी, गोविंद कदम, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, दिलीप चौधरी, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, गजानन सातभाई, संजय साळवे, दशरथ पोपळघट, अशोक कदम, सुयोग नालकर, आदिनाथ तनपुरे, प्रवीण कदम, किसन खंडागळे, पांडुरंग उदावंत, छबु अडागळे आदी उपस्थित होते.