Breaking News

अतिक्रमणाच्या माथी हाणू हातोडा,भले तरी नैसर्गीक स्रोतांच्या मोकळ्या करू वाटा

नाशिक/कुमार कडलग - तुकाराम मुंडे नावाच्या झंझावाताने मनपा हद्दीतील अतिक्रमणं एकामागून एक उध्वस्त करण्याचा सपाटा लावल्याने शहर परिसराचा गुदमरलेला श्‍वास मोकळा होत आहे.मनपा आयुक्तांची ही कर्तव्य दक्षता नाशिकरांमध्ये चैतन्य निर्माण करीत असून या चैतन्यातूनच आयुक्तांवर नाशिककरांच्या अपेक्षांचे ओझे वाढू लागले आहे.मनपाच्या स्थानिक कारभार्यांसह अतिक्रमणाच्या विळख्यात नाशिककरांची मान आवळणार्या दादा भाईंना धडा शिकवणार्या आयुक्तांनी शहरातून कधी काळी प्रवाहीत असलेल्या नैसर्गीक जलस्रोतांना मोकळे करून भुमाफीयांनाही कारवायाच्या कक्षेत आणावे अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करीत आहेत.श्रशरव
गुलाशनाबाद ते जनस्थान असा प्रवास करीत नाशिक नावावर स्थिरावलेले गांव आज स्मार्ट सिटीच्या दिशेने धावत आहे.मंञभुमी ते तंञातून यंञभुमी अशी झेप घेतांना या गावाने अनेक स्थित्यंतरे झेलली.अनेक नेत्यांनी या गावाच्या चौफेर विकासासाठी अमुल्य योगदान दिले.


काळासोबत माणसं बदलत गेली.माणसांचे हेतू बदलत गेले.नाशिकच्या विकासात योगदान देतांना आधी स्वार्थ जपण्याची वृत्ती वाढत गेली.विकासाच्या गाड्याचे जु खांद्यावर घेतलेल्या कारभार्यांचे हेतूही बदलत्या वातावरणासोबत प्रदुषीत झाले आणि बोलता बोलता अवघे शहर हेतु प्रदुषीत प्रवृत्तींच्या विळख्यात सापडले.या प्रवृत्तींच्या कृतीने शहराची अध्यात्मिक,ऐतिहासिक आणि आय टी हब म्हणून प्रकाशझोतात येऊ पाहणारी ओळख कालबाह्य ठरून बकाल वास्ती कडे झुकू लागली,प्रशासकीय पातळीवर शहराचा कारभार पाहणारे पाहूणे म्हणून वावरू लागल्याने पाहूणचाराचा कालावधी पुर्ण करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडून ठोस काही घडले नाही.त्याचा फायदा शहराला वेठीस धरून स्वार्थ साधणार्या प्रवृत्तींनी उपटला.
मोकळी दिसणारी जागा हडप करणार्या टोळ्या शहरात कार्यरत झाल्या.एका बाजुला शहराचा कारभार चालवायचा आणि दुसर्या बाजुला लोणी पळवायचा धंदा तेजीत आला .त्यातून शहरभर अतिक्रमणाचे जाळे विणले गेले.रस्ता,नदी नाले सपट करून त्यावर इमारती ,शैक्षणिक संकुले दिमाखात उभी राहून नफेखोरी सुरू झाली.
एका ठराविक काळानंतर बदल अपरिहार्य असतो.हा सृष्टीचा नियम आहे.हा नियम या शहराच्या कुंडलीत तुकाराम मुंढे नावाच्या कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या येण्याने कार्यान्वीत झाला आणि शहराचे रूपडे पालटण्यास सुरूवात झाली आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मनपा आस्थापनाला लागलेली जळमटे दुर करण्यापासून झालेली सुरूवात रस्त्यावर दृश्य स्वरूपात दिसणार्या अतिक्रमणाच्या उध्वस्तीकरणापर्यंत पोहचली आहे.शहराच्या मध्यवस्तीत आणि उपनगरांमध्येही अदृश्य स्वरूपाची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर आहेत.अनेक धनदांडग्यांनी उभारलेल्या शापींग काम्प्लेक्सच्या तळघरातील पार्कींगच्या जागेवर गाळे काढून व्यावसायिक वापर सुरू केला आहे.शहरातून वाहणार्या ओढ्यांवर,नाल्यांवर माती दगडांची भर टाकून त्या जागेचा व्यवसायिक वापर केला आहे.मनपा आयुक्तांनी या नैसर्गीक स्ञोतांनाही भुमाफीयांच्या विळख्यातून सोडवावे अशी अपेक्षा नाशिककरांनी एकूणच परिस्थितीवरून स्वाभाविक बनले आहे.