Breaking News

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबीर समाजोपयोगी ः नगराध्यक्ष

सकल मराठा समाज कर्जत तालुका आणि एशियन हॉस्पिटल अहमदनगर यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालयात केले होते. शिबीराच्या उद्घाटनाचे वेळी नगराध्यक्ष म्हणाले की, सकल मराठा समाजाने या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले सर्वरोग निदान शिबीर समाजोपयोगी असून यामधून सकल मराठा समाजाने विविध जातीधर्मामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. उद्घाटन कार्यक्रमावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके, अशोक खेडकर, भास्कर भैलुमे, दादा सोनमाळी, सचिन घुले, डॉ. सचिन पांडुळे व सचिन पोटरे यांनीही भाषणातून या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. कार्यकमाच्या प्रस्ताविकामध्ये अ‍ॅड.धनराज रानमाळ-राणे यांनी कर्जत तालुका सकल मराठा समाजाची शिबीराविषयी भूमिका हेतू स्पष्ट केला. सर्वरोग निदान शिबीरामध्ये दिवसभर एशियन हॉस्पीटलचे डॉ. सचिन पांडूळे व त्यांच्या टीमने एकूण 242 रुग्णांची तपासणी करून त्यांचेवर प्रथमोपचार केले. रुग्णांना मोफत औषधे वाटण्यात आली. सर्वरोग निदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. दिपक भोसले, विजय तोरडमल, नाना निकत, सुनील शेलार, महेश शिंदे, निलेश तनपुरे, दादा चव्हाण, नितीन तोरडमल, धनंजय लाढाणे, नितीन जगताप, काका काकडे, राहुल नवले, अजित वडवकर, प्रसाद कानगुडे, श्रीहरी जगताप, भैय्या शेळके आदींनी परिश्रम घेतले.