Breaking News

अमेरिकेच्या शास्त्रज्ञाची उंबरी-बाळापूरला भेट

आश्वी : संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच बाळासाहेब भुसाळ यांच्या डाळिंब शेतीला जगातील सर्वात मोठी कृषी क्षेत्रासाठी खते निर्मिती करणाऱ्या अमेरीकास्थित मोजेक कंपनीचे शास्त्रज्ञ कायल फ्रिमॅन यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी मोजेक कंपनीचे डॉ. शशिकांत भेंडे, डॉ. निलेश भोसले व प्रशांत उंबरकर यांनी भुसाळ यांच्या डाळिंब शेतीची पाहणी करत त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यानी विचारलेल्या प्रश्नांना पाहुण्यानी समाधानकारक उत्तरे दिली. याप्रसंगी भुसाळ कुंटुबीयानी केलेल्या आदरातिथ्याने परदेशी पाहुणे भारावले. यावेळी सरपंच किरण भुसाळ, नाना थोरात, सुनिल भुसाळ, विलास बाम्हणे, सतीष भुसाळ, अनिल भुसाळ, लहानु भुसाळ, गोकूळ भवर, शशिकांत भुसाळ, संतोष उंबरकर, पोपट शिंदे, रंगनाथ बाम्हणे, स्वप्निल उंबरकर, संकेत भुसाळ आदींसह डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.