Breaking News

भारतीय बहुजन महासंघातर्फे शेवगाव तहसील कार्यालयावर घंटानाद आंदेलन

शेवगाव तालुका भारतीय बहुजन महासंघ यांच्याकडून शेवगाव तहसीलदार कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून करण्यात 
आली. 

भारतीय बहुजन महासंघातर्फे केल्या गेलेल्या या आंदोलनातील प्रमुख मागण्या यावेळी आयु. प्रथमेश सोनवणे यांनी मांडल्या, भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अटक करावी, भीमा कोरेगाव प्रकरणातील बहुजन बांधवावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, ओबीसी,व्हीजेएनटी, एसबीसी या मागास प्रवर्गात शिष्यवृत्ती देण्यात यावी, एसटी,एसी या प्रवर्गातील शिष्यवृत्ती देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्युट च्या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. या प्रमुख मागण्या घेऊन भारतीय बहुजन महासंघ आज शेवगाव तहसील कार्यालयावर घंटानाद मोर्चा घेऊन आला होता ! यावेळी या मोर्चाचे नेतृत्व कम्युनिष्ट संजय नागरे, आयु. सोनवणे, वसंत साबळे यांनी केले. यावेळी मोर्चेकर्‍यांकडून शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारले ! यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .