Breaking News

इरई धरणाचे संवर्धन करू - बावनकुळे

नागपूर, दि. 12, एप्रिल - चंद्रपुरातील महानिर्मीतीच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी इराई धरणाचे पाणी वापरले जाते. या धरणात मुबलक पाठीसाठा असणे आवश्यक आहे. त्याकरिता या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नवी दिल्ली येथील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कक्षात आज, बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाशी निगडित विविध समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. 


चंद्रपूर जिल्ह्यात महानिर्मीतीचा वीज प्रकल्प आहे. याला लागणारे पाणी इरई धराणातून आणले जाते. सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती करण्यास पुढील काळात समस्या निर्माण होऊ शकते. ती निर्माण होऊ नये, यासाठी चारगाव धरणाचे पाणी इराई धरणाला सोडले जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाण्याची पातळी वाढ विण्यासंदर्भातील इतर उपाययोजनाही आखण्यात येतील, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. इराई धरणाचे संवर्धन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महाजनकोमध्ये करार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
खाणीसाठी अथवा ऊर्जा प्रकल्पांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जमीन अधिग्रहीत केलेल्या 52 गावांमध्ये आतापर्यंत कोणताच लाभ सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून मिळालेला नाही. या गांवाना सीएसआरच्या निधीतून पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न तातडीने सोडवून, त्यांच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे ऊर्जा विभागातील विविध ठिकाणी असणा-या रिक्त जागांवर सामावून घेण्यासंदर्भात निर्णय यावेळी झाला. याशिवाय वीज निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी होणारी चोरी थांबविण्यसाठी अत्याधुनिक निगराणी तंत्रज्ञान बसविण्याबाबत मंजुरी देण्यात आली. सोबतच येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्येच कोळसा वॉशरी प्रकल्प उभारण्यात येईल. यामुळे वाहतुकीवरील खर्चामध्ये बचत होईल. महाजनकोचा चंद्र्रपूर जिल्ह्यातील रिक ाम्या जागेचा अभ्यास करून या ठिकाणी भारत सरकारच्या सौरऊर्जा महामंडळ आणि महाजनकोमध्ये करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे बैठकीत निश्‍चित करण्यात आले.