मेंढी शिवारात उसाच्या शेतात आढळले 4 बछडे
नाशिक, दि. 12, एप्रिल - सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात आज ऊसतोडणी मजुरांना शेतात बिबट्याचे चार बछडे एकत्रित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी धाव घेत या बचड्यांना सुरक्षित अधिवास मिळावा व पिल्लांची आई भेटावी या उद्देशाने शेतात हुसकवले असून अद्यापपावेतो त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
मेंढी शिवारात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून बिबट्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे. या बिबटयांकडून सायंकाळनंतर वाटसरूंवर हल्ले होण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. या भागात अधिवासासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने व सहजगत्या शिकार उपलब्ध होत असल्याने बिबट्यांची प्रजनन क्षमता देखील वाढली आहे. उसाच्या एकाच शेतामध्ये महिनोन्महिने वास्तव्य करणे सहज शक्य होत असल्याने साहजिकच बिबट्यांना सुरक्षितता लाभली आहे.
आज कडवा पाटचारी लगत दशरथ पुरी यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू होते. या मजूरांना शेतात अंतरांतरावर बिबट्याच्या एक दोन नाही तर एकावेळी चार बछड्यांचे दर्शन झाले. मांजरीच्या आकाराचे हे बछडे पाहून परिसरात मादीचेही वास्तव्य असावे या भीतीने सर्वांची धावपळ उडाली. याबाबत सिन्नरचे वनक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांना कळवण्यात आले.
वनविभागाच्या कर्मचार्यांनी तात्काळ धाव घेत उसाच्या शेतात झालेली बघ्यांची गर्दी हटवली. परिसरात मादी असल्याच्या शक्यतेने या बचड्यांना उसात हुसकावून लावण्यात आले. सायंकाळ पर्यंत शेतात गुडूप झालेल्या बचड्यांवर वन कर्मचारी चहूबाजूनी लक्ष ठेवून होते. पिलांच्या शोधात मादी या भागात येण्याची शक्यता असल्याने परिसरातील रहिवाशाना सावधगिरीचा सूचना देण्यात आल्या आहेत.