Breaking News

2371 शिक्षकांना बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, एप्रिल - गतवर्षी बदली प्रक्रियेतून सुटका झालेल्या प्राथमिक शिक्षकांना यावर्षी मात्र बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षक ांची ऑनलाईन यादी तयार झाली असून यामध्ये 2 हजार 371 शिक्षकांचा समावेश आहे.


प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आता शासनाने ऑनलाईन केली आहे. त्यातच सुगम व दुर्गम क्षेत्राचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल्या पेल्या जाणार असून समानीकरण निकषही लावला जाणार आहे. एकाच तालुक्यात सलग 10 वर्ष सेवा बजावलेल्या शिक्षकांचा समावेश बदली पात्र यादीत करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 1452 शाळांपैकी 1037 शाळांमधून 1481 उपशिक्षक आणि 491 पदवीधर अशा एकूण 1922 मराठी माध्यम शिक्षकांचा समावेश आहे. तर 16 उर्दू माध्यम शाळांतील 23 उपशिक्षक आणि आठ पदवीधर अशा 31 शिक्षकांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बदली पात्र 1953 शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे.
एकाच तालुक्यात किमान तीन वर्षे सलग काम पेलेल्या शिक्षकांना बदलीचा अधिकार प्रदान करण्यात आला असून बदली अधिकार पात्र यादीत त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये मराठी माध्यमांच्या 233 शाळांमधून 384 उपशिक्षक, 30 पदवीधर अशा 414, तर उर्दू माध्यमांच्या तीन शाळांमधून चार उपशिक्षक अशा एकूण 418 शिक्षकांचा समावेश आहे.
एकूण शिक्षकांपैकी टक्केवारीनुसार बदली करण्याच्या धोरणाला खो देत शासनाने ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरु केली आहे. प्रत्येक तालुक्यात शिक्षक संख्या समान करून दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान मराठी माध्यमातील बदली पात्र व अधिकार प्राप्त अशा दोन्ही मिळून देवगड तालुक्यातून 290, दोडामार्ग 165, कणकवली 449, कुडाळ 489, मालवण 275, सावंतवाडी 363, वैभववाडी 146, वेंगुर्ला 159, तर उर्दू माध्यमातील देवगड तालुक्यातून 6, मालवण 5, कणकवली 10, कुडाळ 6, सावंतवाडी 4, वैभववाडी 7 शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.