Breaking News

निघोज पतसंस्थेस 2 कोटी 71 लाखांचा ढोबळ नफा : बाबासाहेब कवाद


निघोज नागरी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31 मार्च या दिवशी नफातोटा व ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा कायम ठेवली. मार्चअखेर पतसंस्थेस 2 कोटी 71 लाखांचा ढोबळ नफा झालेला असून सर्व तरतूदी वजा करता 1 कोटी 91 लाखांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी दिली.
 
पतसंस्थेच्या पुणे आणि नगर जिल्ह्यात 12 शाखा कार्यरत असून लवकरच टाकळी हाजी, ता. शिरूर याठिकाणी 13 वी शाखा सुरू होत आहे. पतसंस्थेच्या ठेवीत 21 टक्के वाढ होऊन 31 मार्च अखेरपर्यंत 95 कोटी 89 लाखांच्या ठेवी, 55 कोटी, 45 लाखांचे कर्जवाटप करून सीडीरेशो 50.33 इतका आहे. संस्थेची थकबाकी 5.25 टक्के इतकी आहे. संस्थेने 57 काटी 56 लाखांची विविध बँकांत सुरक्षित गुंतवणूक केलेली असून, संस्थेची मालमत्ता 2 कोटी 83 लाख तसेच संस्थेचा स्वनिधी 12 कोटी 27 लाख असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लंके यांनी दिली.
 
संस्थेने केलेली ठेववाढ व इतर प्रगती उल्लेखनीय असल्याचे उपाध्यक्ष नामदेव थोरात यांनी सांगितले. पतसंस्थेने स्वतःचे एटीएम सेवा सुरू करून बँकेसारख्या सुविधा देणारी जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे. खातेदारांच्या संस्थेतील खात्यावरून कोणत्याही बँकेत मोबाईलच्या सहाय्याने आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे रक्कम पाठविणे व स्विकारण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. लाईट बील व टेलीफोन बील भरणा सुविधा संस्थेने उपलब्ध केल्याचे संचालक वसंत कवाद यांनी सांगितले.