Breaking News

19 ते 22 एप्रिल कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. 12, एप्रिल - जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 19 ते 22 एप्रिल या क ालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याच दरम्यान कोकण वधुवर मेळावा ही घेण्यात येणार आहे.या महोत्सवाचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. 

महोत्सवाची सुरुवात दि. 19 एप्रिल रोजी शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेत कोकणी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ही शोभायात्रा भोसरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरु होऊन अंकुशराव लांडगे नाट्यगृहात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर सावरेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत दशावतार कालियामर्दनचा या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. दशावतार, शक्तीतुरा, संगीत भजनाचा डबलबारी सामना, मालवणी एकांकिका अशा विविध कार्यक्रमांनी जा महोत्साब रंगणार आहे.यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन क रमाळकर यांना कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वयंवर वधुवर सूचक वेबसाईटचे उदघाटन नारायण राणे व भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाचा समारोप 22 एप्रिलला वधु वर मेळाव्याने होणार आहे. त्यानंतर पावने इले रे ही मालवणी एकांकिका होणार आहे.