Breaking News

तुकाराम बीज सोहळ्याची नेवासा येथे काल्याची दहीहंडी फोडून सांगता


नेवासा /शहर प्रतिनिधी/- येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बिजे निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याची ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उत्साहात सांगता करण्यात आली.

तुकाराम बिजे निमित्त झालेल्या काल्याच्या कीर्तन कार्यक्रमा प्रसंगी ह.भ.प. नंदकिशोर खरात, गायत्रीताई वाघ, शंकर लोखंडे, मुरलीधर कराळे, लक्ष्मणराव पाटील, नगरसेवक सुनील वाघ, अँड.के.एच. वाखुरे, बापूसाहेब गायके, ह.भ.प.शेजुळ, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज आढाव, ह.भ.प. भरत पठाडे, गिरीजा नाथ महाराज जाधव, साधनाताई मुळे, दिलीप जामदार,राजेंद्र परदेशी, पी.आर.जाधव, डॉ.लक्ष्मण खंडाळे, रमेश सोनवणे, दिलीप दहातोंडे, बबनराव काकडे, यावेळी उपस्थित होते.

प्रसंगी बोलतांना देशमुख महाराज म्हणाले की, संत तुकाराम महाराजांच्या गाथा ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे तुकोबारायांची गळा भेट घेण्यासारखे आहे. तो आनंद जीवनात प्राप्त व्हावा. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथांचे पारायण नेहमी केले पाहिजे. यावेळी माऊली शिंदे, भास्कर महाराज तारडे, पठाडे महाराज काकडे, महाराज चव्हाण महाराज, रामभाऊ कडू महाराज, सखाराम महाराज जामदार, गोरख भराट, मयूर डौले, संदीप आढाव यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.