Breaking News

केरळच्या धर्तीवर राज्यात अन्न सुरक्षा दल.

मुंबई : राज्याचे वित्त व नियोजन व गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी नुकतीच केरळ कृषी विद्यापीठाच्या मनुठ्ठी येथील कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन विद्यापीठाच्या अन्न सुरक्षा दल (आर्मी) संकल्पना व कृषी उपकरण तंत्रज्ञानातील नव्या संशोधनांची माहिती घेतली. विद्यापीठाने तयार केलेले कृषी तंत्रज्ञानावर आधारित नवीन मॉडेल महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यासाठी विद्यापीठाबरोबर सहकार्य करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

केरळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आर. चंद्राबाबू यांच्याशी केसरकर यांनी चर्चा करून विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध संशोधन कल्पनांची मा हिती घेतली. केरळ कृषी विद्यापीठामार्फत अन्न सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा दल ही संकल्पना अतिशय उपयुक्त असून त्याचे अनुकरण महाराष्ट्रात क रणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. अन्न सुरक्षा दल, कृषी उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र, कृषी यंत्राच्या सेवा व दुरुस्तीसाठीचे मोबाईल युनिट ही नाविन्यपूर्ण मॉडेल असून शेती क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. केवळ अशा अभिनव आणि व्यावहारिक दृष्टिकोनातूनच शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणे शक्य आहे. महाराष्ट्रात प्रथम दोन जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा दल व कृषी यंत्र उपकरणे सेवा व दुरुस्ती केंद्र ही मॉडेल स्वरुपात सुरु करण्यात येतील.