Breaking News

प्रशासकीय इमारतीला नाव कॉम्रेड पी. बी. कडू यांचे नाव द्या; ‘विद्रोही’ची निदर्शने


कम्युनिस्ट चळवळीतील कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांचे नाव राज्यात मोठ्या अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या कर्तृत्वाची जाण तालुक्याने ठेवली पाहिजे, म्हणून पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कॉम्रेड पी. बी. कडू यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, या आंदोलनात कॉ. गंगाधर जाधव, कॉ. ज्ञानेश गायकवाड, कॉ. मदिना शेख, कॉ. शरद संसारे, संदीप कोकाटे, डॉ. जालिंदर घिगे, गजाब लकडे, किरण विधाटे, शशिकांत विधाटे, आयु बाबा साठे, प्रदीप पवार, रमेश जगधने, सागर क्षीरसागर, भारत धोंडे, सतीश जाधव, अप्पासाहेब गागरे, सोमनाथ कांबळे, आनंद गुलदगड, फकिरा संसारे, बाळासाहेब भुजाडी, राजू सगळगीळे, नवनाथ पवार, हिरामण भुतांबरे, कैलास बुळे, नामदेव वाघ, गंगा वाघ आदी सहभागी झाले होते.