Breaking News

निमगाव येथे बाल आनंद मेळावा उत्साहात ४१ शाळांचा सहभाग


शिर्डी प्रतिनिधी - निमगाव येथील जिल्हा परिषद निमगाव-(को.) येथे जिल्हा परिषद साकुरी गटाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्याचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी सभापती हिरा कातोरे, शिक्षण समितीचे उपाध्यक्ष राजेश परजणे, जि. प. सदस्या पुष्पा रोहम,पं. स. सदस्य ओमेश जपे, काळू राजपूत सरपंच शिल्पा कातोरे, उपसरपंच अजय जगताप मार्केट कमिटीचे संचालक शरद मते, कैलास कातोरे, नगरसेवक तुषार गोंदकर, भाऊसाहेब कातोरे, विजय कातोरे यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा शालिनी विखे यांनी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉल्सना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारुन वस्तूंची खरेदी केली. या बालआनंद मेळाव्यात साकुरी पंचायत समिती गटातील ४१ शाळांनी भाग घेतला. यावेळी सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी २०० शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बालआनंद मेळावा उत्साहात पार पडला. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. वाकचौरे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. राऊत यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाघमारे, मीरा सांगळे, उज्वला शिंदे यांनी केले. 

बालआनंद मेळाव्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सी. बी. शिंदे, केंद्रप्रमुख कमल लावरे, मुख्याध्यापक मंगला रणशूर, शिक्षक बॅंकेचे संचालक बाबासाहेब खरात, शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन रावसाहेब सुंबे आदींनी यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एन. टी. गवते यांनी आभार मानले.