Breaking News

शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा


मागील दोन वर्षांचा दुष्काळ व यंदा झालेली अतीवृष्टी यामुळे खंडित झालेल्या उत्पादनामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. तसेच कांद्याचे ढासळलेले भाव, त्यासाठी झालेला प्रमाणाबाहेरील खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. यापुढील पैसे उभे राहण्यासाठी शेतातील पिके जगविने गरजेचे असताना वीज वितरणकडून मात्र वीज बिल वसुलीसाठी वीज बंद करण्यात आलेली आहे.

इतर राज्यात शेतकर्‍यांना वीज मोफत पुरवली जाते. मात्र महाराष्ट्रात सक्तीने वीज वसुली करून विज पुरवठाही खंडीत केला असल्याने शेतकर्‍यांना जेरीस आणले आहे. यामुळे शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वीज पुन्हा जोडून देण्यात यावी अन्यथा आज रोजी वीज वितरण पुढे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, शेतकरी संघटनेचे लालासाहेब सुद्रीक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.