Breaking News

गोदावरी अभियानासाठी कर आकारा

कोपरगाव : तालुक्यातील नदीस्वच्छता अभियानासाठी एक विशिष्ट कर आकारण्यात यावा, अशी सूचना या अभियानाचे कार्यवाह निलेश गावडे यांनी केली. नाशिक समूहातर्फे दि. १४ ते २२ दरम्यान आंतरराष्ट्रीय नदीसंवर्धनदिनानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छोटू जोबनपुत्रा होते. नगराध्यक्ष विजय वहाडने, उपनगराध्यक्ष विजय वाजे, डॉ. अजेय गर्जे, नगरसेवक सत्येन मुंदडा आदी यावेळी उपस्थित होते.