दखल - वाद पुतळ्यांचा आणि प्रतिमांचा!
त्रिपुरातील लेनिन यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादंगाचे काहूर अजून थांबलेले नसताना आणखी काही ठिकाणी पुतळ्यांची विटंबना आणि प्रतिमापूजनावरून वाद सुरू झाले आहेत. लोकसभेची निवडणूक एक वर्षावर आली असताना देशात अशाप्रकारची अशांतता निर्माण होणं, दोन समाजांत कलह निर्माण होणं नक्कीच चांगलं नाही. देश एकीक डं विकास करीत असताना दुसरीकडं विकासाच्या वाटेवरून त्याला मागं फिरविण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले, तेव्हा त्यांनी विकासाच्या मुद्यांना प्राधान्य देण्याचं जाहीर केलं होतं. विवादास्पद मुद्दे बाजूला ठेवले होते; परंतु त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आता विवादास्पद मुद्याचं राजकारण करायला सुरूवात केली आहे.
विजयाच्या उन्मादात त्यांनी पुतळ्यांची मोडतोड सुरू केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही लोक जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करीत असतील, तर ती कृतीही तेवढीच निषेधार्ह आहे. राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांबाबत महाराष्ट्र सरकारनं जसं धोरण ठरविलं होतं, तसं धोरण आता देशभर घेण्याची आवश्यकता आहे. पुतळ्याची तोडफोड करून, विटंबना करून महापुरुषांचे विचार कधीच संपत नाही; परंतु त्यामुळं दोन समाजात ज्या दंगली होतात, त्या दंगलीमुळं होणारं नुकसान कधीही भरून येत नाही. परस्परांविरोधात जो अविश्वास निर्माण होतो, त्यातूनही नुकसान होत असतं.
समाजकंटकांनी पुतळ्यांची तोडफोड करण्याचं लोण आता उत्तर प्रदेशातही पोहचलं असून मीरत येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. मीरतचे पोलीस अधीक्षक राजेशकुमार यांनी सांगितलं, की चार ते पाच जणांनी दगड उचलले आणि ते आंबेडकरांच्या पुतळ्यावर मारले. पुतळ्याचं आणखी नुकसान करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र ते लगेचच पळून गेले. पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. त्रिपुरामध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानं काही कार्यकर्त्यांनी विजयाच्या उन्मादात लेनिनचा पुतळा जेसीबी लावून उखडला होता. त्यानंतर पुतळ्यांची विटंबना करण्याचं लोणच समाजकंटकांमध्ये पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्रिपुरा आणि तामिळनाडूत पुतळ्याच्या तोडफोडीप्रकरणी भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांवर आरोप झाले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नेत्यांना तंबीच दिली. ‘भाजपशी संबंधित नेते किंवा कार्यकर्त्यांचा पुतळ्याच्या तोडफोडीत सहभाग असल्याचं समोर आलं, तर त्यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा शहा यांनी दिला आहे. मीरतच्या खासदारांनीही आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न क रणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘हे समाजकंटक जर भाजपचे असतील, तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,’ असं ते म्हणाले आहेत. मोदी, शहा असं म्हणत असतील, तर त्यांनीही तीनही घटनांमधील आरोपींचा शोध लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस दाखविलं पाहिजे. त्रिपुरानंतर मंगळवारी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. यातही भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानं भाजपवर टीका होत होती. निवडणुकीत कमावलं, ते पुतळ्यांत घालविलं, अशी भाजपची स्थिती झाली आहे. शहा यांनी, ‘आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही. या घटना दुद र्ैवी आहेत. मी त्रिपुरा आणि तामिळनाडूतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे. पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,’ असं त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी फटकारल्यानंतर तामिळनाडू भाजपला जाग आली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष टी. सुंदरराजन यांनी आर. मुथूरमनची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा आरोप मुथूरमनवर होता. पोलिसांनी त्याला अटकदेखील केली आहे. राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनीदेखील पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध केला.
पुतळ्यांच्या मोडतोडीचं आणि विटंबना करण्याचं लोण त्रिपुरा, तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही पोहोचलं आहे. पश्चिम बंगालमधील कालीघाट येथील भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पुतळ्यांच्या विटंबनेचा बदला विटंबनेनंच देण्याचं पेव सुटल्याचं चित्र या घटनेवरून दिसत आहे. क ालीघाटमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा एक अर्धपुतळा आहे. हे कृत्य कोणी केलं त्याची अद्याप माहीती मिळालेली नाही. हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांनी पुतळ्याचं फक्त नुक सानच केलं नाही, तर त्याला काळंदेखील फासलं आहे. या प्रकारानंतर संबंधितांनी पुतळ्याच्या खाली एक पोस्टरही ठेवलं आहे. हे पोस्टर बंगाली भाषेत आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे स चिन सयंतन बासू यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्रालयाकडून याबाबतची माहिती करून घेतली. गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना या घटनेबाबतचं परिपत्रक पाठविलं आहे. देशभर सुरू असलेल्या या घटना थांबवण्यासाठी तसंच हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे आदेशही गृहमंत्रालयानं दिले आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. त्यांनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. कालांतरानं हा पक्ष विसर्जित करण्यात आला. पुढं भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. श्यामाप्रसाद यांनी कायद्याची पदवी मिळवल्यानंतर 1926 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. वयाच्या 33 व्या वर्षीच कोलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले. इतक्या लहान वयात कुलगुरूपदी नियुक्त झालेले ते पहिलेच व्यक्ती होते. एकीकडं हे असताना दुसरीकडं वादग्रस्त दादोजी कोंडदेवाची प्रतिमा बसविण्याचा आग्रह ब्राह्मण संघानं धरल्यामुळं महाराष्ट्रातही वातावरण पेटलं आहे. जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजी कोंडदेवांचा खरा इतिहास पुढं आला असून त्यांच्याबाबत ब्राम्हण संघानं पुळका दाखविला, तर संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांच्या हाती आयतं कोलित दिल्यासारखं होईल.