Breaking News

डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्याचा लिलाव?


पुणे : न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या समोरील अडचणीत नव्याने भर पडली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले कर्ज परत न केल्यामुळे त्यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेक डीला लागून हा बंगला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यासंबंधीची जाहिरात दिली आहे. डीएसके राहत असलेल्या या बंगल्याचा लिलाव येत्या 8 मार्चला होणार आहे. या बंगल्याची किंमत 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना काल पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील 48 तास ससून रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला होता. पंरतू डी.एस.के च्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या अपिलांनतर त्यांना पुढील 48 तास दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली.