भाविनिमगाव / वार्ताहर । कोकमठाण ता. कोपरगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय चला खेळूया स्पर्धेत नेवासा तालुक्यातील नांदुर शिकारी जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सुवर्ण व रौप्य पदक मिळविले. तर विद्यार्थीनींच्या कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करून उपस्थितांचे मने जिंकली. कुस्ती स्पर्धेत शाळेतील दोन मुलींचा सहभाग होता. त्यातील निकीता लीपने या आठवीच्या विद्यार्थीनी 38 किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले, तिची नाशिक येथे होणार्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर 35 किलो वजन गटात उर्मिला धुमाळ या 7 वीच्या विद्यार्थिनीने कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या दोन्ही खेळाडुंना क्रिडा शिक्षक अंकुश नवले मुख्याध्यापक दत्तात्रय घुले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच शशिकला राजमाने, उपसरपंच गोरक्षनाथ लीपने, पोलीस पाटील मच्छिंद्र लीपने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वनाथ लीपने, सुनिता पाचेगावकर, आशा माने, पंढरीनाथ काशिद, लक्ष्मण गायकवाड, नामदेव धायतडक, अंबादास बोरुडे, गोपाळ राऊत, रवींद्र पवार, सचिन लीपने आदींसह ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.
नांदुरशिकारी शाळेच्या विद्यार्थ्याचे क्रिडा स्पर्धेत यश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:00
Rating: 5