कासगंज : उत्तर प्रदेशमध्ये कासगंज येथे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवेळी दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर हिंसाचार उफाळून आला. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुसऱया दिवशीही याच कारणावरून समाजकंटकांनी पुन्हा हिंसाचार व जाळपोळ केल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊजणांना ताब्यात घेतले असून संपूर्ण गावासह जिल्हा सीलबंद केला आहे. साध्वी प्राची यांनाही प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तर जिवंत बॉम्ब सापडल्यानेही खळबळ उडाली आहे
उत्तर प्रदेशात कासगंजमध्ये हिंसाचारात एक ठार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:57
Rating: 5