Breaking News

बारव सुरक्षा व सुशोभिकरण या चौथ्या प्रकल्पाचे 26 जानेवारीला लोकार्पण


पारनेर/प्रतिनिधी /- ऐतिहासिक बारवेची सुरक्षा व सुशोभिकरण या चौथ्या प्रकल्पाचे लोकार्पण आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी,शुक्रवार,दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता वेशीच्या आत बारवेसमोर होईल. हा प्रकल्प ग्रामपंचायतच्या सहकार्याने करण्यात आला आहे. यावेळी पारनेर तालुक्यातील उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बांडे व सरपंच सुनिता झावरे यांनी दिली.
संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक बारवेची सुरक्षा व सुशोभिकरण हा प्रकल्प आम्ही टाकळीकर ग्रुपने ग्रामपंचायतच्या सहकार्याने राबविला आहे. बारवेवर नेत्रदीपक कारंजे बसविण्यात आले असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. बारवेला सुरक्षीत कठडे बसविण्यात आले आहेत. यामुळे गावातील मुख्य बाजारपेठेचे वैभव परत प्राप्त होण्यास मदत होईल. यावेळी पारनेर तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दहा उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. मागील वर्षी तालुक्यातील विविध सामाजिक संस्थाना हे पुरस्कार दिले होते. यावेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या आम्ही टाकळीकरच्या वेबसाईटचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.