संपादकीय - मोदी लाटेची पीछेहाट...
गुजरात निवडणूकांचे पडसाद येत्या लोकसभेच्या निवडणूकांत पाहायला मिळणार याची भाजपसह काँगे्रसपक्षाला जाणीव असल्यामुळेच गुजरात राज्यात सत्ता टिकविण्यात भाजपने आपली संपूर्ण शक्ती प्रचारात उभी केली होती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपची सत्ता उखडून फेकल्यास इतर राज्यांमध्ये सत्ता स्थापन करणे सहज शक्य होईल असा काँगे्रसचा होरा होता. त्यामुळेच दोन्ही पक्षांकडून गुजरात काबीज करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.
या निकालामुळे देशभरातील राजकीय विश्लेषक या निकालांचे विश्लेषण करूत आहे. मात्र या निकालांमुळे भाजपच्या गोटात धास्ती, तर काँगे्रसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. वास्तविक काँगे्रसने 80 जांगा जिंकल्या मात्र त्यांना बहूमताचा जादूई आकडा 90 गाठता आला नाही. केवळ 12 जांगापासून काँगे्रस दूर राहिल्यामुळे सत्ता स्थापन करण्यापासून वंचित राहावे लागले. य 12 जागांचा विचार केल्यास काँगे्रस येथे केवळ 300-500 मतांनी पराभूत झाली आहे.
त्यामुळे मतांचे धूव्रीकरण करण्यात भाजप यशस्वी झाली. त्यामुळे काँगे्रसचा पराभव झाला असेच म्हणावे लागेल. तसेच भाजप या निवडणूकीत आपल्या सगळया लवाजम्यासह उतरली होती ती. ज्यामध्ये मंत्रीमंडळ, विविध राज्यातील आमदार, खासदार, स्वत: पंतप्रधान यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या प्रचारात मोठया संख्येने उतरले होते. तर या निवडणूकीत काँगे्रसकडून बर्याच चुका झाल्या. या निवडणूकीत काँगे्रस जिंकण्यासाठी उतरली नव्हती असे आमचे स्पष्ट मत असून, काँगे्रस राहूल गांधीनां या निवडणूकींच्या निमित्ताने प्रेझेंट करीत होी, असाच सूर या निवडणूकींच्या निमित्ताने पाहायला मिळतो.
जर या निवडणूकीत प्रियंका गांधी सक्रिय झाल्या असत्या, तर कदाचित काँगे्रसने बहूमताचा टप्पा गाठला असता. मा राहुल गांधीच्या नेतृत्वावर शिक्कामोतर्ब करायचे असल्याने, या निवडणूकीत प्रियंका गांधी जास्त भिरकल्या नाहीत. तर काँगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या तब्बेतीमुळे प्रचारात सक्रिय भाग घेवू शकल्या नाहीत. याचा फायदा भाजपला झाला. एकीकडे भाजपचे सर्वोत्तम नेते प्रचारयंत्रणेत सक्रिय असतांना, केवळ राहुल यांच्यावर निवडणूकींचा भार सोडल्यामुळे काँगे्रसने मुसंडी मारली, मात्र बहुमतापासून दुर राहिली, असेच या निवडणूकांच्या निकालांवरून म्हणावे लागेल.
काँगे्रसपक्षांची दुसरी नेतृत्वाची फळी आता खिळखिळी झाली असून, नवीन चेहर्यांना समोर आणण्याचे महत्वाचे काम राहुल गांधीना येत्या लोकसभेच्या निवडणूकांच्या निमित्ताने करावे लागणार आहे. लोकसभेच्या निवडणूकींपूर्वी कर्नाटक, या राज्याच्या निवडणूका येऊ घातल्या आहे. कर्नाटकमध्ये काँगे्रसची सत्ता असून, सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान काँगे्रससमोर आहे. कारण काँगे्रस हा राष्ट्रीय पक्ष असला, तरी तो आता केवळ चार राज्यात शिल्लक राहिला आहे.
तर भाजप लोकसभेच्या निवडणूकांपासून एक-एक राज्य काबीत करत चौदा राज्यावर आपल्या पक्षांचा मुख्यमंत्री बसविण्यात यशस्वी झाले आहेत. ता उर्वरित पाच राज्यात मित्रपंक्षाच्या सहाय्याने सत्ता स्थापन केली आहे. तर याउलट काँगे्रस एक- एक राज्य गमावत चालले आहे. असे असतांना पक्षाला राष्ट्रीय कार्यक्रम देण्याची जवाबदारी काँगे्रसचे अध्यक्ष म्हणूपन राहुल गांधी यांच्यावर येऊन पडली आहे.
नोटाबंदी व जीएसटी हे आता कालबाह्य मुद्दे झाले असून, त्यावर निवडणूका जिंकणे सोपे आहे, हा काँगे्रसचा भ्रम आहे. त्यामुळे काँगे्रसला आपल्या टीकेची भाषा बदलावी लागणार आहे. नवीन मुद्दे समोर आणावे लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपला देखील विकास आणि भ्रष्टाचार हे गुळगुळीत शब्दाऐेवंजी जनतेला प्रत्यक्षात विकास दाखवावा लागणार आहे. अन्यथा भाजपची पीछेहाट होण्यास वेळ लागणार नाही.