Breaking News

लायनेस क्लबतर्फे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बालोद्यान

रत्नागिरी, दि. 04, नोव्हेंबर - रत्नागिरी लायनेस क्लबतर्फे कायमस्वरूपी काम म्हणून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात बालोद्यान उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रांजल गुंजोटे यांच्या हस्ते झाले. या वेळी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. पाताडे यांनी श्रीफळ वाढवले.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, लायनेस क्लबच्या अध्यक्ष प्राची शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजन मोरे, लायन्स झोन चेअरमन नदीम काझी, लायनेस क्लबच्या सचिव सईदा बाग, खजिनदार स्वाती सोनार, कोऑर्डिनेटर राजन, श्रेया केळकर आदी उपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत शेरखाने यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली. बालोद्यानामध्ये वेल्डिंग काम करणारे कारागीर प्रकाश चव्हाण यांचा सत्कार डॉ. देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. देवकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच यंदा राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. रुग्णालयात आणखी सुविधा देण्याचा मानस असून त्यासाठी लायन्स, लायनेस सारख्या सामाजिक संस्थांनी मदत करावी, असे आवाहन केले.