पाणी संस्थांसाठीचे धोरण बदलणे गरजेचे - शरद पवार
सांगली, दि. 05, नोव्हेंबर - दुष्काळाशी दोन हात करीत बागायती शेती पिकविण्यासाठी स्वबळावर पाणी योजना राबवून त्या चालविणा-या पाणी वापर संस्थांसाठी सरकारी धोरणात बदल करण्याची गरज आहे. हे पाणी माफत दरात मिळावे, यासाठी वीजबिल व पाणीबिलांची फेररचना गरजेची आहे. त्यासाठी लवकरच सर्वांना घेऊन केंद्र शासनाकडे पाठपुरावा क रणार आहे, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांनी दिली.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील सिध्दराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते.
रौप्य महोत्सव वर्ष साजरे करणा-या या संस्थेकडून वार्षिक एकरी पाणीपट्टी 4400 ते 5200 रूपये आकारली जाते, हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, की आपण 100- 125 पाणी योजना राबविल्या. निरा- क-हावरून शेतक-यांच्या बांधापर्यंत पाणी नेले. तिथे सुरूवातीला पाणीपट्टी एकरी 700 रूपये होती, आता ती एकरी 2200 ते 2300 रूपये आहे. यात शंभर रूपयांची जरी वाढ केली तरी शेतकरी दंगा करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी लवकरच सर्वांना सोबत घेऊन केंद्र शासनाशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.