सुरक्षेच्या कारणाने फटाका मार्केटसाठी शहरातील जागा नाकारली
औरंगाबाद, दि. 14, ऑक्टोबर - गेल्या वर्षी जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केटला मोठी आग लागली होती त्या पार्श्वभूमिवर औरंगाबाद फटाका असोसिएशनला जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केट थाटण्यास यंदा ही जागा नाकारण्यात आली. सदर भाग हा शहराच्या मध्यवस्तीत येत असल्याने परवानगी नाकारण्यात आली असून त्याा ऐवजी गावाबाहेर असलेल्या अयोध्यानगरी परिसरात हे मार्केट उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. दिवाळी काही दिवसांवर आलेली असताना फटाका मार्केटची जागा लवकर ठरत नसल्याने आणि पावसाचे वातावरण असल्याने फटाका विके्रते अस्वस्थ झाले आहेत. आणलेले फटाके तो पर्यंत कुठे ठेवारचे हाही प्रश्न आहे.परवानगीचा हा प्रस्ताव सध्या पोलिस आयुक्तालयाच्या दरबारी आहे.