एसटी कर्मचार्यांना अडीच व अधिका-यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान
मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - एसटीच्या 1 लाख 4 हजार कर्मचार्यांना जुलै 2016 पासून प्रलंबित असलेल्या 11 टक्के महागाई भत्यासह रू 2500/-इतके व 2 हजार अधिकारी वर्गाला रू 5000/-सानुग्रह अनुदान (बोनस) दिवाळी भेट म्हणून देण्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केली.
जुलै 2016 ते सष्टेंबर 2017 या 15 महिन्याचा 7 टक्के थकित महागाई भत्ता व ऑगस्ट 2017 ते सष्टेंबर 2017 चा 4 टक्के प्रलंबित महागाई भत्त्या पोटी 113 कोटी रूपये व सानुग्रह अनुदानापोटी 27 कोटी रूपये, असे 140 कोटी रूपये तात्काळ कामगारांच्या खात्यावर वग करण्याचे आदेश रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले असून कामगारांना महागाई भत्याच्या थकबाकीसह 15 हजार ते 20 हजार रुपये मिळणार असल्याने एसटी कर्मचार्यांची दिवाळी आनंदात साजरीहोईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.