पोलादपूरनजीक अपघातात पाच ठार, सात जखमी
अलिबाग, दि. 14, ऑक्टोबर - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पार्ले ते दिविल के. टी. बंधारा (ता. पोलादपूर, जि. रायगड) येथे आज सकाळी झालेल्या अपघातात कंटेनरखाली आठआसनी मिनिडोर चिरडून पाचजण ठार तर सातजण जखमी झाले. सर्व मृत आणि जखमी महाड तालुक्यातील आहेत.
महाडकडून पोलादपूरकडे येणार्या आठ आसनी मिनीडोरला गोव्याकडून मुंबईकडे जाणार्या एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यावेळी मिनिडोरमधील दोन प्रवासी बाहेर फेकले गेल्याने ते वाचले, तर कंटेनर खाली आलेल्या मिनिडोरमधील चालकासह दहा प्रवासी मिनिडोरसह चिरडले गेले. अपघातात मिनीडोरचालक मुझफ्फर उस्मान येलूकर (वय 40, माटवण मोहल्ला, ता.पोलादपूर), निकम अंबाजी कांबळे, (38, चांढवे खुर्द, बौद्धवाडी, ता. महाड), नाबीबाई बाबूराव जाधव (70, चांढवे खुर्द, ता. महाड), दिनेश शंकर चोरगे (40, रानवडी, खडकवाडी, ता. पोलादपूर) आणि सोहम सचिन जाधव (6, चांढवे खुर्द, ता.महाड) या प्रवाशांचा मृत्यू झाला. रविना राकेश चाळके (40, चांढवे खुर्द, ता.महाड), देवेश राकेश चाळके (7, चांढवे खुर्द, ता. महाड), संतोष वसंत पोळेकर (29, नडगाव, ता. महाड), दशरथ नारायण सुतार (40, नडगाव, ता. महाड), श्रीमती इंदू विठोबा चव्हाण (54 चांढवे खुर्द, ता. महाड), अनिता गणपत पवार (65, चांढवे खुर्द, बौद्धवाडी, ता. महाड) आणि रुद्र रमेश चव्हाण (दीड वर्ष, चांढवे खुर्द, ता. महाड) हे इतर सात प्रवासी जखमी झाले आहेत. पोलादपूर पोलिसांनी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्वांना मिनिडोरबाहेर काढण्यात यश मिळविले.
अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक अनिल अंधेरे आणि अन्य कर्मचार्यांनी मदतकार्य केले. यावेळी राजगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उपसभापती शैलेश सलागरे यांच्यासह पोलादपूर तालुक्यातील विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि तहसीलदार शिवाजी जाधव, गटविकास अधिकारी डॉ.भूषण जोशी आणि वाहतूक पोलीस तसेच सामाजिक कार्यकर्तेही घटनास्थळी मदतकार्यासाठी हजर झाले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतांची ओळख पटविण्यापासून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचे काम तत्परतेने केले.