Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा कंदील मोर्चा

परभणी, दि. 14, ऑक्टोबर - विजेचे भारनियमन ,महागाई आदी विषयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढला होता. बी.रघुनाथ सभागृहापासून दुपारी 12 वाजेपासून या मोर्चाला सुरूवात झाली. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन भारनियमनाचा विरोध केला. तसेच मधेच काही काळ रास्तारोकोही केला.