विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना ठाणे स्मार्ट सिटी संचालक मंडळाची मंजुरी
ठाणे, दि. 31, ऑक्टोबर - ठाणे स्मार्ट सिटी संच तिस-या बैठकीत नाले विकास प्रकल्प, मलःनिसारण, खाडी किनारा संवर्धन आणि सुशोभिकरण, पादचा-यांसाठी विशेष मैदान येथील भूमिगत वाहनतळ आणि नवीन रेल्वे स्टेशन आदी सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर मिनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त (अतिरिक्त क ार्यभार) तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महसूल विभागाचे प्रधान सचिव तथा ठाणे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये नाले विकास विस्तारीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) 4010 मीटरचे आरसीसी नाले बांधणे आणि 150 मीटर लांबीचे कल्व्हर्ट बांधण्याच्या एकूण 49.22 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ठाणे शहरातील क्षेत्र आधारित विकास योजनेतंर्गत सर्वांगिन मलःनिसारण यंत्रणा निर्माण क रण्यासाठीही संचालक मंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पातंर्गत शहरामध्ये 24.90 कोटी रुपये खर्च करून सर्वांगिण मलःनिसारण प्रकल्पाच्या उभारणीकरिता निविदा मागविण्यासाठी संचालक मंडळाने मान्यता दिली.