जलयुक्तमुळे पूर्व विदर्भात 83 हजार हेक्टरचे हंगामी सिंचन
नागपूर, दि. 31, ऑक्टोबर - विदर्भात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत हाती घेतलेली बहुताश कामे प्रगतीपथावर असून नागपूर विभागातील 80 टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे पूर्व विदर्भात सुमारे 83 हजार हेक्टरचे हंगामी सिंचन झाले असून शेतक-यांना जलयुक्त शिवारमुळे मोठी मदत झाल्याचे चित्र आहे.
शेतक-यांसाठी राज्य सरकारने हातील घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या वर्षी (2015-16 मध्ये) नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 1077 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण 23 हजार 759 कामे सुरु करण्यात आली होती. त्यापैकी 23 हजार 603 कामे पूर्ण झाली असून 156 प्रगतीपथावर आहेत. यातून सुमारे 83 हजार 724 हेक्टर क्षेत्र हंगामी सिंचनाखाली आले आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात (2017-18 मध्ये) नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 915 गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी एकूण 21 हजार 474 कामे सुरु करण्यात आली. त्यापैकी ऑगस्ट 2017 अखेर 19 हजार 499 कामे पूर्ण झाली असून 1082 कामे प्रगतीपथावर आहेत. या अभियानातील गाळ क ाढण्याच्या कामात शासनाबरोबरच लोकसहभागही फार मोठ्या प्रमाणावर लाभतोय.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत यंदा नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 185 गावापैकी 119 गावांत शंभर टक्के तर 66 गावांत 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील 59 गावापैकी 43 गावांमध्ये शंभर टक्के कामे पूर्ण झाली असून 18 गावांमध्ये 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्ह्यात 77 गावांपैकी 74 गावात शंभर टक्के तर 3 गावांमध्ये 80 कामे पूर्ण झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 213 गावांपैकी 117 गांवे शंभर टक्के तर 31 गावांमध्ये 50 टक्के कामे झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील 169 गावांपैकी 91 गावांमध्ये शंभर टक्के कामे झाली असून 64 गावांमध्ये 80 टक्के तर 3 गावांमध्ये 50 टक्के कामे झाली आहेत. तसेच वर्धा जिल्ह्यातील 212 गावांपैकी 135 गावांमध्ये शंभर टक्के कामे झालेली असून 68 गावांमध्ये 80 टक्के तर 6 गावांमध्ये 50 टक्के कामे झालेली आहेत.
जलयुक्त शिवारसाठी गेल्या वर्षी शासनाकडून 271.32 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तसेच विशेष निधी व अभिसरणाद्वारे उपलब्ध झलेल्या निधीमधून 305.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नागपूर विभागात 2016-17 या आर्थीक वर्षात 51 हजार 839 टीसीएम पाणी साठा क्षमता निर्माण झाली असून 26 हजार 388 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.