स्वस्तिक संस्थेने दिली 493 दृष्टीहिनांना दृष्टी
सोलापूर, दि. 31, ऑक्टोबर - स्वस्तिक सामाजिक संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय याच्या संयुक्त विद्यमानाने प्रसिद्ध नेत्रविकार तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. राघिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात 493 दृष्टी हिनांना दृष्टी मिळाली.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया शिबिरास शहर आणि जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रूग्णांनवर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या पथकाने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात 493 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्यांना पुन्हा एकदा दृष्टी मिळवून दिली. अंधांना पुन्हा दृष्टी मिळाल्याने रूग्णांचा आनंद गगणाला मावनासा झाला होता. त्यांचे आयुष्य प्रकाशमय झाल्याने त्यांचा आनंद त्याच्या चेह-यावर दिसत होते. प्रत्येक रुग्ण डॉ. लहाने आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख याचे आभार व्यक्त करत होते. शनिवारी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी करत सोमवारी सकाळी घरी सोडण्याअगोदर डॉ. लहाने यांनी समुपदेशन करत ऑपरेशननंतर घ्यावयाच्या काळजी संदर्भात साध्या आणि घरगुती उदाहरणे देत काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.