संपकरी एसटी कर्मचा-यांचा 36 दिवसांचा पगार कापण्याचा महामंडळाचा निर्णय
एसटी कर्मचा-यांनी चार दिवस केलेल्या संपामुळे महामंडळाचे 125 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. संप केल्यास दंडात्मक कारवाई म्हणून प्रत्येक दिवसाकाठी आठ दिवस याप्रमाणे कर्मचा-यांचा पगार कापण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार कर्मचा-यांचे दंडात्मक कारवाईचे 32 व संपाचे 4 दिवस असे मिळून एकूण 36 दिवसांचे वेतन क ापण्याबाबत एसटीकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. दरम्यान याबाबत आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.