Breaking News

एटीएममधून 19 लाखांची लूट करणारी टोळी अटकेत

ठाणे, दि. 14, ऑक्टोबर - मुंब्रा-कौसा परिसरातील साऊथ इंडियन बँक व इंडियन बँकेच्या एटीएममधून 19 लाख 75 हजारांची लूट करणा-या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. साऊथ इंडियन बँक व इंडियन बँकेत 49 जणांचे खाते आहे. या 49 जणांच्या बँक खात्यातून तब्बल 19 लाख 75 हजार रुपये परस्पर काढल्याच्या तक्रारी मुंब्रा पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली. हैदरअली सारंग तबस्सुम अबु बखर मेस्त्री उर्फ जान्हवी उर्फ जोत्स्ना, सोहेल शेख आणि मोंहमद जैद फरीद रंगवाला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.