सार्वजनिक बांधकामला आणखी किती बळी हवेत?
अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - नगर-सोलापूर महामार्गाची अवस्था खूपच दयनिय झाली आहे. या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघातात वाढ होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हा महामार्ग नगरच्या चांदणी चौक ते चापडगाव पर्यंत 81 किलोमीटर अशोका बिल्डकॉन ग्रुपने तयार केला आहे. या ग्रुपने गेली 15 वर्षे पथकर तत्वावर टोलनाका चालविला. परंतु, या ग्रुपला हा टोल नाका गेल्या 5 वर्षांपासून मुदत संपल्याने बंद करावा लागला. हा महामार्ग मुत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर अहोरात्र मोठ्या प्रमाणावर वाहतुक सुरू असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे आजपर्यत हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला, तर काहीना कायमचे अपंगतत्व आले आहे. त्याचबरोबर चांदणी चौक (नगर), रुईछत्तीसी, घोगरगाव, मिरजगाव क्रांतीचौक, डुकरीनदी, माहीजळगाव या गावामध्ये रस्त्याच्या कडेला मोठमोठी अतिक्रमण करून येथील व्यावसायिकांचादेखील जनतेला व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. शारदीय नवरात्र उत्सव काळात मोहटादेवीच्या दर्शनासारी नगर ’ पुणे ’ कल्याण सह नाशीक ’ बीड ’ औरंगाबाद आदि विकाणाहुन हजारो भावीक पायी चालत येतात . नगर - पाथर्डी हे अंतर 60 किलोमिटर आहे. या दरम्यान सर्वांत जास्त भावीक पायी चालत असतात . यामध्ये महीला व नवतरूणांचे प्रमाण अधिक असते या पायी येणार्या भाविकांचे वैशिष्य म्हणजे हे विना चप्पलचे म्हणजे अनवानी असतात .रस्त्यावर पसरलेलया खडीमुळे या भाविकांना त्रास होऊ शकतो. यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त हाणे गरजेचे आहे.
दोन वर्षापूर्वी हे अतिक्रमण काढण्यात आले होते. परंतु, थोड्याच दिवसात पुन्हा अतिक्रमणधारकांनी आपला पसारा मोठा करून रस्त्याच्या कडेला उभे केल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून महामार्गावरील रस्त्याचे व साईडपट्याचे काम पूर्ण करावे आणि त्या पुढे रस्त्याची झालेली भगदाडे बुजवावी, जेणेकरून जिवितहानी टळेल. यासाठी लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी परिसरामधून मागणी होत आहे.