Breaking News

भारनियमन त्वरीत बंद करण्याची काँग्रेसची मागणी

बुलडाणा, दि. 16, सप्टेंबर - शहरात महावितरणच्या वतीने लोडशेडींग सुरू करण्यात आल्यामुळे त्याचा प्रभाव सर्वत्र जाणवत आहे. भारनियमनामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तरी सदर भारनियमन त्वरित बंद करण्यात यावेत अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीला देण्यात आला. 
माजी आ. दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची 13 सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयात ठिय्या देऊन भारनियमन रद्द करण्याबाबत चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक मुळे, माजी जि.प. सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी सभापती सुरेश वनारे, कृउबास संचालक श्रीकृष्ण धोटे, माजी सभापती राजाराम काळणे, पं.स. सदस्य मनिष ठाकरे, इनायतउल्लाखां, विठ्ठल सोनटक्के, पं.स.सदस्या सौ. ज्योतीताई सातव, नरगसेविका संगिता पाटील, सरस्वतीताई खासने, नगरसेवक प्रविण कदम, तुषार चंदेल, बबलु पठाण, शफीउल्लाखाँ यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात आले या निवेदनामध्ये नमुद आहे की, सध्या जिल्ह्यात कर्जमाफीचे भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु असून त्याची अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत आहे. मात्र या दरम्यान भारनियमन करण्यात येत असल्यामुळे शेतकर्‍यांना  कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहे. तसेच भारनियमनामुळे सिंचनालाही कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. तसेच भारनियमनामुळे सिंचनाखाली फटका बसत आहे. सध्या पिकांन पाण्याची गरज आहे. मात्र भारयिमनामुळे कृषीपंप धारक पिकांना पाणी देवु शकत नाही.