वाचनाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन समृद्ध- माजी आ. अभंग
अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - माणूस शिकला म्हणजे शहाणा झाला असे होत नाही. तर शिक्षण घेऊन पुस्तकांचे वाचन करून प्रगल्भता आली तरच माणूस खर्या अर्थाने शहाणा होतो. वाचनाने येणारी संस्कृती फार महत्वाची आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ग्रंथ-पुस्तकामध्ये अलौकिक ज्ञानाचा साठा आहे. वाचनाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन माजी आ. अभंग यांनी केले.
येथील ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघ, अजब प्रकाशन कोल्हापूर, ज्ञानेश्वर ग्रंथालय व दीनमित्र ग्रामीण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनात ते बोल्ट होते. या प्रदर्शनाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन दि. 13 रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडूरंग अभंग यांच्या हस्ते झाले.
कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, बबनराव धस, रामभाऊ पाउलबुद्धे, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, अजब प्रकाशनचे मनोज साळुंखे, रवींद्र सावंत, बाळासाहेब डोहाळे, भाऊसाहेब चौधरी, मछिंद्र साळुंके, संभाजी माळवदे, अशोक भूमकर, उपप्राचार्य भारत वाबळे, साहित्यिक भाऊसाहेब सावंत, प्रबोधनकार सदाशिव शिंदे, कवी बाळासाहेब आरगडे, एकनाथ कावरे, शंकर भारस्कर, बाळासाहेब उगले, पंजाब उगले आदींची यावेळी उपस्थिती होती.