Breaking News

शहरातील अवजड वाहतुक बंद करा - राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - शहरातील अवजड वाहने बंद व्हावीत यासाठी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलने केली मात्र अवजड वाहतुक बंद होत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु गुरुवार दि.14 रोजी चांदणी चौकात महिला पोलिस कर्मचारी यांचा अपघात होऊन जागेवर मृत्यू झाला. तसेच त्यांचे पती व मुलगा हे ही गंभीर जमखी झाले आहे. यातुन आता पालकमंत्री यांनी लक्ष घालुन शहरातील होणारी अवजड वाहणांची वाहतुक बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाव्दारे पालकमंत्री प्रा.शिंदे यांची भेट घेवुन केली आहे.
यावेळी अभिजीत खोसे, संजय झिंजे, उबेद शेख, प्रकाश भागानगरे आदीसह नगरसेवक उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शहरातुन होणारी जड वाहतुक बंद होणे गरजेचे आहे. या जड वाहतुकीबाबत वेळोवेळी आम्ही आंदोलन, मोर्चे काढून व निवेदन देऊन सदरची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणुक दिलेली आहे. तरी देखील याबाबत ठोस उपययोजना प्रशासनाकडून होताना दिसुन येत नसल्याने नागररिकांच्या मनात असुरक्षततेची भावना निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक महाविद्यालये, शासकीय कार्यालय, शाळा, प्रमुख बस स्थानके, मार्केट असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते अशी अपघाताच्या घटना घडल्याने या ठिकाणावरही जाताना नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत.  तरी पालकमंत्री यांनी लक्ष घालुन तात्काळ जड वाहतुक शहरातुन बंद करण्याचे आदेश द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.