’मेड इन चायना’ राख्यांवर देशवासियांचा बहिष्कार!
नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट - (सोमवार दि. 7 ऑगस्ट) रक्षाबंधनानिमित्त देशभरातील सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. राखी खरेदीसाठी महिला वर्गानेही मोठी गर्दी केलेली आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे, यंदाही बाजारात चायनिज राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण यंदा चायनिज राख्या खरेदी न करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियातूनही ‘मेड इन चायना’ राख्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
एका सर्वेक्षणानुसार, चायनिज वस्तू भारतीय वस्तूंच्या तुलनेत स्वस्त असतात. पण यंदा भारतीय वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा जास्त असल्याचं यातून दिसून येत आहे. विशेष म्हणजे केवळ नागरिकांकडूनच नाही, तर विक्रेत्यांनीही या बहिष्कारात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
आग्र्यातील एक दुकानदार मुकेश लालवानी यांनी सांगितलं की, चीन आमचेच पैसे घेऊन, आम्हालाच धमक्या देत आहे. तेव्हा त्यांचा माल खरेदी करुन त्यांचा फायदा का करुन द्यावा? अशाच प्रकराची भावना इतर भागातील राखी विक्रेत्यांची असून, सर्व विक्रेत्यांनी यंदा चीनचा मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई आणि महाराष्ट्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ‘मेड इन चायना’ शालेय साहित्य खरेदी करु नये, असं आवाहन पालकांना केलं होतं. विद्यार्थी आणि पालकांनी यापुढे वॉटर बॉटल, डबा, कंपास, रंग, स्केचपेन, पट्टी, पॅड, रबर यासारखं चिनी बनावटीचं शालेय साहित्य घेऊ नये, असं सांगण्यात येत होतं. त्यालाही पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.