कंत्राटी कामगारांसंबंधीचे मुद्दे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने मांडावेत
पुणे, दि. 16, ऑगस्ट - अल्फा लावल कंपनीच्या दापोडी येथील कारखान्यासमोर राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेली निदर्शने ही असमर्थनीय आणि बेकायदा आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार या कंत्राटी कामगारांसंबंधीचे काही मुद्दे असतील तर ते संबंधित कंत्राटदार कंपनीकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने मांडावेत, अशी भूमिका अल्फा लावल कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतली आहे.
कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विविध कंत्राटदारांच्या सेवेत असलेल्या परंतु कंपनीच्या दापोडी कारखान्यामध्ये कामास पाठविण्यात आलेल्या कामगारांचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीने अलीकडेच कंपनीसमोर निदर्शने केली होती. ही निदर्शने बेकायदेशीर आहेत. तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कंपनीला पाठविलेल्या पत्रात केलेले दावे दिशाभूल करणारे आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.भारतामध्ये अल्फा लावल कंपनी गेली 80 वर्षे कार्यरत असून या संपूर्ण काळात कंपनीने देशातील सर्व कायद्यांचे पालन करीत एक जबाबदार व्यावसायिक घटक म्हणून आपली सारी कर्तव्ये पार पाडली आहेत. जागतिक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून अल्फा लावलने नेहमीच कर्मचा-यांच्या मानवी हक्कांचा आणि जिथे जिथे कंपनीचे अस्तित्व आहे. त्या सर्व स्थानिक समुदायांचा नेहमीच आदर केला आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने कर्मचारी नियुक्ती आणि रोजगाराच्या संदर्भात कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेदभाव राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.सतत सुधारणा करीत राहण्याच्या तत्वाला अनुसरून अल्फा लावलने कंत्राटी कामगारांसह कंत्राटदार राबवित असलेल्या प्रक्रिया व व्यवस्थांवर देखरेख ठेवण्याच्या आणि त्याचा आढाव घेण्याच्या आपल्या कार्यपद्धतीतही खूप सुधारणा केल्या आहेत. कंत्राटी कामगारांविषयी कंपनीला सहानुभूती आहे. कायद्यातील तरतुदींनुसार या कंत्राटी कामगारांसंबधीचे काही मुद्दे असतील तर ते संबंधित कंत्राटदार कंपनीकडे राष्ट्रीय श्रमिक आघाडाने मांडावेत, अशी भूमिका अल्फा लावल कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतली आहे.