सातारा जिल्हा परिषदेतील भंगार साहित्यातून मिळाले 96 हजाराचे उत्पन्न
सातारा, दि. 07 - सातारा जिल्हा परिषदेकडील सर्व विभागाचे सुमारे 15 वर्षापूर्वीचे निरुपयोगी भंगार साहित्य अडगळीत पडुन होते. हे सर्व विभागाचे साहित्य एकत्र करुन खावली ता. जि. सातारा येथे साठविण्यात आले होते. सर्व साहित्य निरुपयोगी व भंगार असल्याने त्याचा लिलाव करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली. या निरोपयोगी साहित्याची अंदाजे 84 हजार इतकी किंमत होती . त्यामधुन जिल्हा परिषदेला अंदाजे 93 हजार रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. जाहीर लिलाव शुक्रवार दि.4 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आला.
ही लिलाव प्रक्रिया अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.व्ही साळुंखे यांनी पार पाडली. सध्या जिल्हा परिषदेचे झिरो पेंडन्सीचे काम सुरु आहे. यावेळीही बरेच जुने साहित्य निघाले आहे. त्याची ही लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडील जुन्या वाहनांचा देखील या पूर्वी तीन वेळा ई-लिलाव व एक वेळेस जाहीर लिलाव करण्यात आला त्यावेळी एकूण सात वाहनांची विक्री करण्यात आली आहे. सध्या सतरा वाहनांचे ई-लिलाव प्रक्रीया सुरू करण्यात आली असून या मधून जिल्हा परिषदेस उत्पन्न मिळून परिसर स्वच्छ होणार आहे.