सिनसिनाटी ओपन : मुगुरूझा, कोनता, हॅलेप यांचा ‘अंतिम 16’मध्ये प्रवेश
सिनसिनाटी, दि. 16, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये चतुर्थमानांकित गार्बिन मुगुरूझा हिने ब्राझीलच्या हद्दाद माईया हिला 6-2, 6-0 असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये मुगुरूझाला काहीसा संघर्ष करावा लागला मात्र दुस-या सेटवर तिने निर्विवाद वर्चस्व राखले आणि स्पर्धेच्या ‘अंतिम 16’ दिमाखात प्रवेश केला. सातव्या मानांकित इंग्लंडच्या जोहाना कोनता हिने नेदरलँड्सच्या किकी बर्टर्न्स हिचा 6-3, 6-3 असा पराभव केला. सामन्यात कोनता पूर्णपणे वरचढ ठरली. रोमानियाच्या द्वितीय मानांकित सीमोना हॅलेप हिनेदेखील अंतिम 16 मध्ये धडक मारली. तिने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेन्ड हिच्यावर 6-4, 6-1 असा विजय मिळवला.
