Breaking News

उद्योग बँकेतर्फे यंदा 10 दिवसीय व्याख्यानमाला

सोलापूर, दि. 24, ऑगस्ट - उद्योगबँक सेवक सांस्कृतिक मंडळ रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव बौद्धिक  व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव अध्यक्ष माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी दिली. 26 ऑगस्ट रोजी पहिले पुष्प ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ  यमाजी मालकर हे अर्थक्रांती या विषयावर गुंफणार आहेत. 27 तारखेला पुण्याचे मोहन पालेशा हे सामाजिक अंतरंग या विषयावर, 28 ऑगस्टला काश्मिरातील पाच  विस्थापित युवक काश्मिरातील सद्य स्थितीचे कथन करणार आहेत. 29 ऑगस्टला कोल्हापूरचे प्रा. मधुकर पाटील हे नेते जोमात, जनता कोमात, विकासाचे स्वप्न  भाषणात या विषयावर तर 30 ऑगस्ट रोजी जालन्याचे लक्ष्मणराव वडले हे अन्नदाता शेतकर्‍याची आत्महत्या आपण या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 31  ला पुण्याचे मिलिंद जोशी हे जीवनातील विनोदाचे सार हा हास्यविनोदावर आधारित कार्यक्रम सादर करतील. सप्टेंबरला मुंबईचे अरविंद इनामदार जगायचे  कशासाठी?, तारखेला पुण्याचे प्रकाश बंग हे इथेच चुकतात व्यावसायिक या विषयावर तर तारखेला मुंबईच्या राही भिडे आजचे राजकारण समाजकारण यावर  मार्गदर्शन करतील. शेवटचे समारोपाचे पुष्प मुंबईचे प्रसाद कुलकर्णी आनंदाची अत्तरदाणी या कार्यक्रमाने गुंफतील. मागील 51 वर्षांपासून ही व्याख्यानमाला सुरू  असून, यंदाचे हे 52 वे वर्ष आहे. सर्व व्याख्यानमाला यंदा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात रोज सायंकाळी साडेसहा वाजता होत आहेत. पत्रकार परिषदेस सादूल  यांच्यासह पुरुषोत्तम उडता, व्यंकटेश चन्ना, सिद्धेश्‍वर गड्डम, श्रीनिवास रिकमल्ले, नागनाथ वल्लाकाटी उपस्थित होते.