Breaking News

चंद्रकांत दादांच्या पाठीत खंजीर खुपसतोय विश्‍वासू अभियंता

दि. 15, जुलै - आ. प्रशांत बंब, आ.चरणदास वाघमारे यांनी केलेल्या आरोपांतील तथ्य आणि या तथ्यामागचे वारकरी कोण?
दादांचा विश्‍वासघात करणारा त्या अभियंत्यांची कार्यशैली, बदलीच्या नस्तीत मुख्यमंञ्यांच्या स्वाक्षरी नंतर लिहीलेल्या नोटची स्पेशालीटी काय? पाञता नसतांना  बढती कशी मिळाली? मंत्री महोदयांशी असलेले हितसंबंध वापरून सहकार्‍यांंना चाल तर लायक अभियंत्यांचे हक्क डावलण्याचे षडयंत्र नाशिकमध्ये कसे राबविले  जाते?
छगन भुजबळ यांना हवं त्या ठिकाणी पोहचवलं, आता चंद्रकांत दादा पाटील यांनाही तिथेच पोहचविण्याचा डाव तर नाही ना अशी शंका येत असून या षडयंत्राचे केंद्र  पुन्हा एकदा नाशिक बनल्याची चर्चा सा.बां. वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रात लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत असून इतिहासाची पुनरावृत्ती होऊन हिमालयाच्या  मदतीला सह्याद्री धावणार आहे. अरूण जेटली यांच्या खांद्यावर असलेला राष्ट्र संरक्षणाचा भार देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्याच्या हालचाली दिल्लीत गतीमान  झाल्या आहेत. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उत्तराधिकारी म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांची मर्जी संपादन केलेले चंद्रकांत दादा पाटील यांची निवड  जवळपास निश्‍चित झाली आहे.
चंद्रकांत दादा पाटील यांची शुध्द चारित्र्य ही प्रतिमा या विश्‍वासाला पुरक ठरली, ती प्रतिमाच कलंकीत करण्याचे षडयंत्र त्यांच्याच विश्‍वासू मंडळीकडून सुरू असल्याचे  विश्‍वसनीय  सुत्रांकडून  कळते. चंद्रकांत दादा पाटील हे मुळ कोल्हापुरचे. उदर निर्वाहासाठी मॅटीक कंपनीची एजन्सी इंटरकॉम सेवा हा त्यांचा व्यवसाय. तर संघ  विचारांशी बांधिलकी. संघाचे प्रामाणिक प्रचारक म्हणून संघ परिवारात त्यांचा परिचय. अहमदनगर सारख्या संघ विचारांना प्रतिकुल असलेल्या मातीतही चंद्रकांत  दादांनी अभाविपचा प्रचारक म्हणून शुध्द भुमिका वठवली. अगदी त्यांचे विरोधक देखील दादांच्या या भुमिकेचे कौतूक करतांना दिसतात. यावरून चंद्रकांत दादा यांच्या  एकुण स्वभाव आणि सामाजिक प्रतिमेचा दर्जा लक्षात येतो, भाजपा आणि नागपुर परिवारात दादांचे स्थान निर्माण करण्यास हीच प्रतिमा निमित्त आहे. परिवाराचा हाच  विश्‍वास चंद्रकांत दादा पाटील यांच्या पदरात योग्य दान टाकण्याच्या तयारीत असतांना दादांच्या या प्रतिमेला सुरूंग लावण्याचा घाट दादांचाच एक जवळचा अभियंता  करीत आहे. चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत राहून दादांच्या नावाचा प्रचार केला जातो की, मी जवळपास सर्व  काम पाहणारा मीच आहे. असा अविभाव  निर्माणतर करी नाही ना ? हा वरीष्ठ अभियंता पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप करीत आहे. चंद्रकांत दादा पाटील यांचे खात्याशी संबंधित असलेले विशेष व्यवहार या  अभियंत्याच्याच हस्ते होतात अशी चर्चा केली जात आहे. खरच दादांनी या अभियंत्याला विशेष अधिकार बहाल केले आहेत काय  अशी चर्चा सा.बा. वर्तुळात झडत  आहे.विश्‍वासघात करण्याचा प्रमाद करणार्‍या या अभियंत्याने आपल्या बॅचमेंट सहकार्‍यासंह स्वतःची पात्रता नसतांना बढती मिळवली. नाशिकमध्ये सध्या बढतीवर  असलेला हा वरीष्ठ अभियंता नक्की काय करतो? पात्र नसतांना या अभियंत्याने बढती कशी मिळवली ? बदल्यांच्या नस्तीमध्ये अतिरिक्त सा.बां.सचिवांशी संगनमत  करून शासकीय दस्तात फेरफार कसा केला? या प्रश्‍नांची दखल सोमवारच्या अंकात.