Breaking News

सायन पनवेल महामार्ग गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

दि. 25, जून - सायन पनवेल विशेष महामार्गाच्या निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक केलेली अनियमितता आणि त्यातून झालेला मोठा गैरव्यवहार या विषयी  दै,लोकमंथनने सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याचा परिपाक म्हणून तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र जवंजाळ यांच्यासह भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अन्य  मंडळींविरूध्द एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या अनियमिततेतून प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होतो.जाणीवपुर्वक भ्रष्टाचाराला वाव ठेवला जातो,या विषयी दै,लोकमंथन  गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आवाज उठवित आहे.सांबातील भ्रष्टाचाराविरूध्द लोकमंथनने घेतलेली स्पष्ट भुमिका भ्रष्ट अधिकार्यांच्या मुळावर उठल्याने लोकमंथन  विषयी अनेक भ्रष्ट प्रवृत्तींच्या पोटात सुळ उठला.अनेकांनी नानाविध क्लुप्त्या योजून लोकमंथन विरूध्द षडयंञ रचले.तथापी भ्रष्टाचाराविरूध्द लोकमंथनची भुमिका  स्पष्ट आणि शुध्द असल्याने अनेकांची भ्रष्ट प्रकरणे चव्हाट्यावर आणली.
सायन पनवेल विशेष राज्य महामार्गाच्या कामात झालेली अनियमितता हे याच पध्दतीने लोकमंथनने धसास लावून दोषी प्रवृत्तींना उघडे पाडण्यात  लोकमंथनने  पुढाकार  घेतला.जवळपास वर्षभराच्या लढाईनंतर लोकमंथनला आपले उद्दीष्ट गाठण्यात यश आले असून या प्रकरणात प्रथमदर्शनी संशयीत आसलेल्या  अभियंत्यांविरूध्द गुन्हा दाखल करणे एसीबीला भाग पडले.हाच लोकमंथनच्या स्पष्ट भुमिकेचा विजय आहे.
या संदर्भात घटनाक्रम असा की,सायन पनवेल विशेष राज्य महामार्ग निर्मिती साठी खासगी विकासकाला आमंञीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर निविदा प्रक्रिया  राबविली गेली.तथापी निविदा प्रक्रिया प्रसिध्द करण्यापासून कामाचे वितरण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान रत्येक टप्यावर तत्कालीन कार्यकारी आभियंत्यांनी या राज्य  महामार्गाचे काम मर्जीतील कंञाटदार कंपनीला मिळण्याच्या दृष्टीने भुमिका घेतल्याचा संशय व्यक्त झाला.या संदर्भात सर्वप्रथम लोकमंथनने वाचा फोडली.प्रक्रिया  राबवितांना कार्य.अभियंत्यांची वारंवार अनुपस्थिती संशय वाढविण्यास कारणीभुत ठरली.
 लोकमंथनच्या पाठपुराव्यासोबत निविदा प्रक्रियेत जाणीवपुर्वक दूर ठेवून अन्याय केलेल्या स्पर्धक कंञाटदार कंपन्यांनीही कंबर कसली.हे प्रकरण कटच्या दरबारात  पोहचले.कटनेही खातरजमा करून अनियमितति झाल्याचा,या अनियमिततेला तत्कालीन कार्यकारी अभियंताच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला.आणि सम्पूर्ण  प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची शिफारस असलेला अहवाल दिला.
या अहवालावर कारवाई अपेक्षित असतांना ज्यांच्यावर अहवालात ठपका ठेवला गेला त्या कार्य.अभियंत्यांच्या हाती चौकशीचे सुञे वरिष्ठांनी सोपविली.यावरून  तळापासून शेंडीपर्यंत सांबाची पुर्ण यंञणा या अनियमिततेत सहभागी असल्याचा आरोप लोकमंथनने आपल्या वेळोवेळी केलेल्या वृत्तांकनांतून केला,अखेर हे प्रकरण  मुंबई उच्च न्यायालयात गेले.उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर अखेर एसीबीने तत्कालीन मुख्य अभियंता प्रकाश मम्मदापुरे,तत्कालीन अधिक्षक अभियंता किसन  माने,तत्कालीन कार्यं अभियंता राजेंद्र जवंजाळ यांच्यासह  केआयपीएस, आयव्हीआरसीएम व अन्य दोषी कंपन्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लोकमंथनचा सततचा पाठपुरावा कारवाई पुर्ण होईपर्यंत थांबत हेच या प्रकरणातूनही सिध्द झाले असून अंजेड्यावर असलेल्या अन्य भ्रष्ट अभियंत्यांसाठी हा इशाराच  आहे.